शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिन साजरा
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/१०/२०२४ – लायन्स क्लब ऑफ पंढरपूर संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला.
पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विक्रम शिरसट व लायन्स क्लबचे झोन चेअरमन माजी नगरसेवक विवेक परदेशी यांच्या हस्ते पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला.
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना अंबाबाई पटांगण येथे रस्ता ओलांडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व ज्याच्या हातात पांढरी काठी त्याला आपण मदत व सहकार्य केले पाहिजे अशी जनजागृती करण्यात आली.वाहतूक शाखेचे पोलीस संजय येलपले यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष बारहाते यांनी पांढरी काठी दिनाचे महत्त्व सांगितले व आजच्या दिवशीच आपण हा दिवस का साजरा करतो याबाबत माहिती दिली .
अध्यक्षा आरती बसवंती यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.राजीव कटेकर यांनी लायन्स क्लबचे कार्य सांगून आपण अंध विद्यार्थ्यांना सहकार्य करावे असे सांगितले.झोन चेअरमन विवेक परदेशी यांनी सांगितले की ज्याच्या हातात पांढरी काठी त्याला आपण मदत व सहकार्य केल पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे .
सदर प्रसंगी आरती बसवंती, राजीव कटेकर, विवेक परदेशी, मुख्याध्यापक संतोष बारहाते, ओंकार बसवंती,सतीश निपाणकर,कैलास करंडे , रोहीणी घोडके , उमा कुलकर्णी, अश्विनी माने , नितीन कटप, महेश म्हेत्रे , इमरान मुल्ला,अनिल कुंभार व सुनील व्यवहारे आदी उपस्थित होते.