अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडी या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून या विरोधात निर्णयक स्वरूपाचे आंदोलन छेडणार -फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा
फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – अजित मल्टीस्टेट शाखा साखरवाडी या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून या विरोधात निर्णय स्वरूपाच्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा फलटण शहर भाजपाचे अध्यक्ष अनुप शहा यांनी दिला असून यासंदर्भात पीडित महिलांची एक बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये लवकरच उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अहिंसा मैदान फलटण येथे व्यापक स्वरूपाची बैठकआयोजित करण्यात आले असून या वित्तीय संस्थेमुळे ज्या ज्या महिलांची व बचत गटांची फसवणूक झाली आहे त्यांनी कृपया खालील व्यक्तींशी संपर्क साधा हिना अक्रम शेख मोबाईल नंबर 92 84 23 87 06,रुकसाना इब्राहिम शेख मोबाईल नंबर 95 61 85 56 91 , अंजना गोकुळ भोसले मोबाईल नंबर 86 00 91 62 36,पायल योगेश पालखी मोबाईल नंबर 96 23 19 16 25 , वर्षा किशोर चव्हाण मोबाईल नंबर 70 28 71 6443 , आसमा असिफ इनामदार मोबाईल नंबर 92 84 63 13 65, शशिकला भोसले मोबाईल नंबर 92 70 11 31 52 , शितल सूर्यवंशी 99 75 97 677 ,रविराज कोटी 77 982 14 420 अक्रम उर्फ मुन्ना शेख 99 70 56 26 61 वरील क्रमांकाची संपर्क साधून ज्या महिलांवर व बचत गटांवर अन्याय झाला आहे त्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेऊन झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्यांना मदत करावी असे आवाहन सौ अक्रम शेख यांनी बैठकीमध्ये बोलताना केले आहे. यापूर्वी सुद्धा मोर्चा महिलांनी काढला होता व स्थानिक राजकीय व्यक्तिमत्त्वांना मदतीचे अहवान केले होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक अनुप शहा म्हणाले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी फलटण शहर यांच्या वतीने तालुक्यातील व शहरातील महिलांना न्याय देण्यासाठी संपूर्ण ताकतीने लढा उभारणार आहे फक्त महिलांनी यामध्ये कुठल्याही दडपणाला बळी न पडता उघडपणे समोर आले पाहिजे.