विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन
नाशिक / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.११/१०/२०२४ : नवरात्र उत्सवानिमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन देवीची विधिवत पूजा करत देवीला महावस्त्र, नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी,भाऊलाल तांबडे शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख, श्यामल दीक्षित शिवसेना महिला आघाडी नाशिक जिल्हा समन्वयक, श्रद्धा जोशी शिवसेना महिला नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख, पूजा धुमाळ इगतपुरी शिवसेना जिल्हाप्रमुख व ऍड.संगीता दवंगे उपस्थित होते.