अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9/10/2024 – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ ढेपे सर हे तर अध्यक्षस्थानी नाना कवठेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेची पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी संजना राऊत यांनी केले.

त्यानंतर भित्तीपत्रकाचे उद्घाटन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.प्रथम सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री ढेपे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात एक शिक्षक कसा असावा शिक्षकांनी काय करावे शिक्षक हा किंग नसून किंगमेकर आहे हे स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना नाना कवठेकर यांनी संस्थेची परंपरा कायम ठेवा असं संदेश दिला.
कॉलेजचे प्राचार्य डॉ हणमंत वाघमारे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का मालपे व गायत्री रणदिवे यांनी केले. विद्यार्थी मनोगत अल्फिया मुलांनी व शबनम आतार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची शोभा वाढण्यासाठी सुंदर रांगोळी सानिया चौगुले यांनी रेखाटली. कार्यक्रमाचे आभार मंगेश भुसे यांनी मानले.

