चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी होणार बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी बावी येथे होणार बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान

१ कोटीचा बैल स्पर्धेत भाग घेण्यासाठी दाखल

चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली मैदानाची पाहणी

ओपन बैलगाडा शर्यत माढा केसरी 2024साठी राज्यभरातून सुरु आहे नावनोंदणी

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त माढा केसरी २०२४ ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान शेटफळ कुर्डूवाडी रोड बावी तालुका माढा येथे शनिवार दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. या मैदानाची पाहणी अभिजीत पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली.

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिक ठेवण्यात आली आहे. या मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २ लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय पारितोषिक १ लाख ५१ हजार १११ रुपये, तृतीय पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये, चौथे पारितोषिक ५१ हजार १११ रुपये, पाचवे पारितोषिक ४१ हजार १११ रुपये, सहावे पारितोषिक ३१ हजार १११ रुपये, सातवे पारितोषिक २१ हजार १११ रुपये असे भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच गट विजेत्या गाडीत दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आदर्श बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून यात प्रमुख आकर्षण मोहित धुमाळ सुसगाव,राहुल पाटील आडवी कल्याण, सुभाष मांगडे नाना पेठ, धनाजी शिंदे सैदापुर, प्रदीप पाटील कापुस खेड, सरपंच संतोष मोडक वडकणे हे असणार आहेत. तरी या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अभिजीत पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी डीव्हीपी मल्टीस्टेटचे चेअरमन औदुंबर महाडिक देशमुख,स्वप्निल मोरे, विठ्ठल कारखान्याचे संचालक धनाजी खरात, शुभम मोरे,दयानंद महाडिक देशमुख,सतीश पडळकर, डि एम मोरे महाराज, सुरज मोरे, श्रीशेल मोरै,अमित मोरे, केदार मोरे,अजित मोरे,आदर्श मोरे,धर्मराज मोरे , विठ्ठल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top