विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.26- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा,पाद्यपूजा,तुळशी पूजा,चंदन उटी पूजा इत्यादी पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंद‍िर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात.या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून,दि.1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

याबाबत मंदिर समितीच्या दि.20 ऑगस्ट रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण झाले असून, भाविकांना पूजेची नोंदणी  https://www.vitthalrukminimandir.org  या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
          
दि.7 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील सण,उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा,तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल.याबाबतची अधिक माहिती,अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहनही कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top