द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत चालू शैक्षणिक वर्ष 2024 साठी विद्यार्थी प्रहरी समिती ची स्थापना करण्यात आली.यावेळी नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत एक युद्ध नशेच्या विरुद्ध हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे सर यांनी नशा मुक्तीवर व्याख्यान दिले.

प्रारंभी विद्यार्थी क्लब मेंबर्सनी केलेली घोषवाक्य व प्रबोधनपर चित्रे यांचे प्रदर्शन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी हा नशेसारख्या वाईट गोष्टींना बळी पडू नये आणि समाजातील प्रत्येकाची ही जबाबदारी आहे याची जाणीव करून देणारे हे अभियान आहे असे व्ही.एम.कुलकर्णी सर यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितले.

विविध मादक पदार्थांच्या सेवनामुळे मानवी जीवनाच्या होणाऱ्या शोषणाबाबत जागरूकता करणे खूप गरजेचे आहे आणि नशामुक्तीकडे पहिले पाऊल आपल्या प्रशालेतून टाकले गेले पाहिजे असे प्रमुख वक्ते एन बी बडवे सर यांनी सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर तसेच उपमुख्याध्यापक बडवे सर,ज्येष्ठ शिक्षक आर एस कुलकर्णी , श्री मोरे सर,श्री पाटोळे सर ,सौ फडके मॅडम, उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना नशा मुक्त जीवन जगण्याची शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भक्ती रत्नपारखी यांनी केले.
