काशीकापडी हा समाज शासनाच्या विविध योजनांपासून वंचित होता

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरच्या पांडुरंगास प्रिय असलेल्या तुळशीच्या माळा बनवणारे कारागीर हे काशी कपडे समाजाचे आहेत.काशी कापडी समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच आहे.वारकरी सांप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व असणार्या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून सबंध महाराष्ट्रात काशी कापडी समाज ओळखला जातो.

राज्यातील विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे. पिढ्यानपिढ्या वारकर्यांची सेवा निस्सिम भावनेने करणारा हा समाज शासनाच्या विविध योजनापासून वंचित होता.परंतू विश्वकर्मा योजनेमध्ये तुळशी माळा बनवणारा कारागिर म्हणून स्वप्निल टमटम यांची शासन दरबारी प्रथम नोंद झाली.

यासाठी समाजातील सदस्य नितीन पानकर, अनिल इंदापूरकर,निरंजन पानकर,विशाल वाडेकर यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी सहकार्य केले.या योजनेचा लाभ सर्व काशिकापडे समाजातील कारागिरांनी घ्यावा असे आवाहन काशिकापडे समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
यासाठी पंढरपूर नगरपरिषद उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर व योगेश काळे,तुळशी माला कारागीर स्वप्नील टमटम ,विशाल वाडेकर,नितीन पानकर ,अनिल इंदापूरकर, निरंजन पानकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
