पंढरपूर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या प्र.तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष पदी शंकर सुरवसे,जिल्हा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शरद पवार व दिलीप पावले तर जिल्हा प्रवक्तापदी विजय कुलकर्णी बिनविरोध

पंढरपूर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या प्र.तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षपदी शंकर सुरवसे,जिल्हा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शरद पवार व दिलीप पावले तर जिल्हा प्रवक्तापदी विजय कुलकर्णी बिनविरोध

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर येथे पार पडलेल्या रास्त भाव दुकानदार संघटनेच्या बैठक शुभारंभ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करत अभिवादन केले.

त्यानंतर श्री.विठूमाऊली च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.संघटना वाढीसाठी युवकांना संधी देत जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर,तालुकाध्यक्ष शंकर सुरवसे,शरद पवार, विजय कुलकर्णी,वहाब शेख,उमेश आसादे यांच्या शुभहस्ते सन्मानपुर्वक नियुक्ती पत्र देऊन पदांची घोषणा करण्यात आले.

तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी संघटनेच्या वाढीसाठी व नवनिर्वाचित युवकांना नव्याने संधी मिळावी याकरिता तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.प्रभारी तालुकाध्यक्ष व पंढरपूर शहराध्यक्ष पदी शंकर सुरवसे व जिल्हा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शरद पवार व दिलीप पावले तर जिल्हा प्रवक्ता पदी विजय कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आले.
             
पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून सर्वानुमते शंकर सुरवसे यांची निवड करण्यात आली.इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे –
कौशल्या पाटील :-जिल्हा संघटक
आप्पा भुई :-तालूका संघटक
नाना भुई :-जिल्हा संघटक
सुधाकर शेळके :-जिल्हा संघटक
सुरेश पवार :-जिल्हा संघटक
दीपक यलमार :-जिल्हा संघटक
शहर उपाध्यक्ष :-सौ.अपर्णा तारके,संजय पवार .
शहर संघटक : सागर जाधव .
सचिव :-सोमनाथ कुलकर्णी .
सह सचिव :- अमर भांडेकर.
खजिनदार :-सोहम भिंगे .
मार्गदर्शन मंडळ :-हरिभाऊ चव्हाण, शशिकांत सुगंधी,विठ्ठल भिसे,माऊली पारसवार .
            
सर्व नूतन पदाधिकारी नियुक्ती पत्र मान्यवर उपस्थितांच्या शुभहस्ते देण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी संघटन आढावा घेऊन विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच थकीत कमिशन रक्कम जमा होईल असे सांगून संघटना पाठपुरावा करत आहे,असे स्पष्ट केले.

नितीन पेंटर यांनी नूतन पदाधिकार्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करताना कामाची पध्दत समजून सांगून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहिती व सांगितली.संघटन बळकटीकरणासाठी नक्की काय करावे ? ते सांगितली.

सर्वांची नवनियुक्ती होत असतानाच जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पावले यांनी नवीन पदाधिकार्यांना साथ देत संघटना बळकटीकरणासाठी वाहून घेण्याचे आवाहन केले.

सर्व कामकाज खेळीमेळीचे व उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे प्रस्तावना शशिकांत सुंगधी यांनी केली. सूत्रसंचालन विजय कुलकर्णी यांनी केले आणि आभार नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शंकर सुरवसे यांनी व्यक्त केले.

यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर,राष्ट्रीय सचिव तथा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर,जिल्हा सचिव राज कमटम,जिल्हा उपाध्यक्ष उमेश असादे,वहाब शेख यांच्यासह पंढरपूर तालूका व शहरातील बहुसंख्य दुकानदार बंधू भगिनीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top