800 किलो बाजरीपासून बनवले पंतप्रधान मोदींचे अप्रतिम छायाचित्र, 13 वर्षीय मुलीच्या नावावर विश्वविक्रम


narendra modi
PM Narendra Modi Birthday- 13 वर्षांच्या एका मुलीने चमत्कार करून आपल्या नावावर एक विक्रम केला आहे. प्रेस्ली शेकिना असे या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेकिनाने 800 किलो बाजरी वापरून जगातील सर्वात मोठी पेंटिंग तयार करून विश्वविक्रम केला आहे.

 

पीएम मोदींना वाढदिवसापूर्वी शुभेच्छा देण्यासाठी शेखिनाने हे चित्र तयार केले आहे. 13 वर्षांच्या शाळकरी मुलीने 800 किलो बाजरी वापरून पंतप्रधान मोदींचे पोर्ट्रेट बनवले आहे, तसेच यासाठी तिला 12 तास सतत काम करावे लागले. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शेखिना यांनी बाजरी वापरून जगातील सर्वात मोठी पेंटिंग तयार केली आहे. तसेच प्रेस्ली शेकिना ही चेन्नईच्या कोलापक्कम भागात राहणारे प्रताप सेल्वम आणि संकिरानी यांची मुलगी आहे. प्रेस्ली शेकिना 8 व्या वर्गात शिकत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार शेखिना यांनी 800 किलो बाजरी वापरून 600 स्क्वेअर फूटमध्ये पीएम मोदींचे मोठे पोर्ट्रेट बनवले. तसेच शेखीनं सकाळी साडेआठ वाजता काम सुरू केलं आणि रात्री साडेआठ वाजता पूर्ण केलं. यासाठी प्रेस्ली यांना गौरविण्यात आले आहे. युनिको वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मुलीचे नाव नोंदवण्यात आले आहे. युनिको वर्ल्ड रेकॉर्ड्सने प्रेस्ली शेकिना यांना विश्वविक्रम प्रमाणपत्र आणि पदक प्रदान केले आहे.

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top