नगरपरिषदेने केलेल्या ठरावाची एक तप पूर्ती तथागताच्या अस्थी दर्शनाने संपन्न

नगरपरिषदेने केलेल्या ठरावाची एक तप पूर्ती तथागताच्या अस्थी दर्शनाने संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०९/२०२४-पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिसोबतच धम्मसेनापती असलेले प्रमुख शिष्य सारिपुत्त व महामोग्लायन यांच्या अस्थिधातू तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातुंचे पंढरपूर येथील बुद्धभूमीवर स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी सम्यक क्रंती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव, अध्यक्ष प्रशांत लोंढे, सचिव स्वप्नील गायकवाड,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र शेवडे, जिल्हाध्यक्ष अक्षय सोनवणे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दीपक वाघमारे, सल्लागार अशोक प्रक्षाळे,रिपाईचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, शिवाजी आवारे, बहुजन हितकारीणी सभेचे अध्यक्ष रवि सर्वगोड, इंजिनिअर सार्थक लोखंडे, सुजित भोसले, शुभम सोनवणे तसेच धम्म उपासिका स्नेहल जाधव, अध्यापिका शीला जाधव, स्मितल जाधव, प्रियांशू लोंढे, सुजाता भोसले, प्रज्ञा भोसले, श्रमिका शिंदे, चांदणी शिंदे, रंजना सोनवणे, सुमन भोसले, सृष्टी बाबर आदींसह श्रद्धाळूंनी दर्शन घेऊन अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना याच दिवशी पंढरपूर नगरपरिषदेने पंढरपूर नगरीचे सांस्कृतिक वैभव संपन्न करणारे जागतिक कीर्तीचे अत्याधुनिक बुद्धविहार उभारण्याचा ठराव केल्याला बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण झाले आहे.या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिसोबतच धम्मसेनापती असलेले प्रमुख शिष्य सारिपुत्त व महामोग्लायन यांच्या अस्थिधातू तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातुंचे दर्शन होणे हा आम्हां पंढरपूरकरांसाठी अमृत योगच म्हणावा लागेल अशी भावना सम्यक क्रंती मंच चे संस्थापक सिद्धार्थ जाधव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Back To Top