स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ,करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाचा महायज्ञ
करंजे ,भोर /ज्ञानप्रवाह न्यूज- आजपर्यंत सर्वांच्या सहकार्यामुळे स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ,करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने मागील ०६-०७ वर्षांमध्ये आपल्या भागातील ४०७ पेक्षा जास्त गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून देऊ शकलो आहोत अशी स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ, करंजे यांनी माहिती दिली आहे.

स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ,करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त रविवार दि.०८ सप्टेंबर, २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, करंजे येथे सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी व्हावे अशी विनंती स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण व जय हनुमान तरुण मंडळ,करंजे यांच्यावतीने करण्यात आली आहे.