भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे

भाविकांची व वृक्षांची तहान भागवणारे माऊली म्हेत्रे

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर पावन नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सेवा,गळ्यात तुळशी माळ,अखंड भगवंताची सेवा करणारा तसेच गेली नऊ वर्ष झाले मे या एक महिन्यात थंड पाण्याची मोफत सेवा देणारा पाणपोई चालू करणारे माऊली म्हेत्रे यांनी निरंतर ही सेवा चालू ठेवली आहे .

वृक्ष प्रेमी मित्र मंडळाच्या मदतीने वृक्ष संवर्धन, संगोपन या सर्वांमध्ये अगदी हिरहीरीने पुढाकार घेऊन वृक्षाचे जतन कसे करता येईल याचा ध्यास मनात घेऊन आपले कार्य करणारे माऊली म्हेत्रे यांचा रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष सोमेश गानमोटे आणि त्यांचे सर्व रोटरी सहकारी सदस्य यांच्यातर्फे सामाजिक कार्याबद्दल सहकुटुंब सन्मान करण्यात आला.

तसेच द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर चे मुख्याध्यापक व्ही.एम कुलकर्णी सर व वृक्षप्रेमी सर्व सदस्य यांच्यातर्फेही उचित सन्मान करण्यात आला.यापुढेही असेच कार्य ,सेवा आपल्या हातून घडत राहो असे रोटरी क्लबचे ए जी साउ सर व सर्व वृक्ष प्रेमी यांनी सदिच्छा व्यक्त केली .

या सत्कारला उत्तर माऊली म्हेत्रे म्हणाले की, जी काही सेवा घडत आहे ती भगवंत परमात्मा श्री पांडुरंगाच्या कृपेने माझ्या हातून घडत आहे आणि याला सर्वांचा तुमचा हातभार लागतोय. त्यामध्ये माझं कुटुंब, माझे वृक्षप्रेमी सर्व सदस्य व माझे मित्र बंधू यांच्या सहकार्याने हे सर्व घडतंय.यात करता करविता भगवंत आहे मी एक नाममात्र आहे आणि मी माझ्या काळजावर हात ठेवून सांगतो की मी कुठेच कोणत्याही कार्यात कमी पडणार नाही.भगवंता ही सेवा अविरत माझ्याकडून घडत राहो ही श्री विठ्ठल रुक्मिणी माते चरणी प्रार्थना करतो आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top