एम.आय.टी.चा मंदार दुधाळे आयआयटी साठी निवड
गुजराथ गांधीनगर इलेक्ट्रिकलसाठी मिळाला प्रवेश
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी पंढरपूर मधील विद्यार्थी मंदार दुधाळे याने जेईई ॲडव्हान्स क्रॅक करून 92.9 % मिळविले. पुढील शिक्षणासाठी त्याची इंजिनिअरिंगसाठी आयआयटी गांधीनगर गुजराथ येथे इलेक्ट्रिकल शाखेत निवड झाली आहे.

पंढरपूर येथील एम आय टी ज्यू कॉलेज मधील गणित विषयाचे प्राध्यापक अवनिश सर,स्वप्ना मॅडम,परेश सर,हेड मिस्ट्रेस सौ शिबानि बॅनर्जी मॅडम, प्राचार्य डॉ स्वप्नील शेठ यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले .
मंदार दुधाळे यांनी शिक्षण घेत असताना विविध परीक्षेच्या माध्यमातून अनेक प्रमाणपत्र मिळविली आहेत. त्याला मिळालेल्या या प्रवेशाबद्दल अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.