केशव राठोड सरांच्या QR Code चे शिक्षणाधिकारी शेख यांनी केले कौतुक
शेळवे /संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज- जि.प.प्राथ.शाळा चव्हाण वस्ती भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथील उपक्रमशील व आदर्श शिक्षक केशव राठोड सर यांनी झाडांच्या माहितीचे व शालेय परिपाठाचे QR code निर्माण केले आहे.चव्हाण वस्ती शाळेच्या परिसरात असलेल्या वृक्षांना QR code ची पाटी लावण्यात आलेली आहे. ते QR code स्कॅन केल्यानंतर सर्व इत्यंभूत माहिती दिसते. या QR code चा पालकांना व विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
संकल्प गुणवत्तेचा स्वेरी कॉलेज, पंढरपूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळेत शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते या QR code चे उद्घाटन व प्रात्यक्षिक करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत करावा असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना उपयुक्त असणारी झाडांची माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन करताना जिल्हा परिषदेतील शिक्षक व विद्यार्थी आधुनिक व अद्यावत होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री लिगाडे ,डॉ. रणदिवे , विस्ताराधिकारी मुख्यालय राऊत उपस्थित होते. यावेळी राठोड यांचा माजी चेअरमन शांताराम गाजरे व शेखर कोरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेस पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख लहू कांबळे यांनी केले.