सहकार क्षेत्रातील डॉक्टर ऋषितुल्य कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक
सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी तळागाळातील तसेच सर्वसामान्य लोकांसाठी काम केले.सहकार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक प्रगती झाली आहे.

सहकार महर्षी सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार उद्योग मोठा केला असून त्यांच्याकडे समाजाभिमुख नेतृत्व होते.कर्मयोगी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रातून केलेल्या कामामुळे अनेक लोकांची आर्थिक प्रगती झाली.सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार क्षेत्राचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केला होता.

सुधाकरपंत परिचारक हे सोलापूर जिल्ह्यातील एक आदरणीय व्यक्तीमत्व होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजसेवेचा विपुल वारसा आणि त्यांच्या पूर्वजांच्या नैतिक नीतिमत्तेतून घडलेले होते. सन 1955 पासून ते पंढरपूर तालुक्यातील सामाजिक जीवनात वावरत होते.कर्मयोगी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी पंचायत समिती,जिल्हा परिषद,डीसीसी बँकेच्या माध्यमातून,२५ वर्षे आमदार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,भीमा सहकारी व पांडुरंग साखर कारखाना,पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्षपद यांच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात त्यांचा वेगळा ठसा आहे. आर्थिकदृष्ट्या नुकसानीत असलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत लक्षणीयरीत्या सुधारले होते. पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक क्रांतीचे ते खरे निर्माते होते.आर्थिक देवाणघेवाणीत पूर्वजांच्या कडक शिस्तीतून त्यांनी सुवर्ण महोत्सवी अर्बन को-ऑप.ला प्रगतीचा मार्ग दाखवला.त्यांनी पंढरपूर अर्बन को- ऑप. बॅंकेला समाजातील दीनदलित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केले त्यामुळे बँक आणि त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली होती.
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते…
श्रध्देय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन…!
पांडुरंग परिवार