खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुर जिल्हा न्यायालय येथे भेट देऊन वकीलांच्या व कोर्टातील समस्या जाणुन घेतल्या
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०८/२०२४- आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी १३/०८/२०२४ रोजी पदाधिकार्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापुर जिल्हा न्यायालय येथे धावती भेट दिली.

यावेळेस वकीलांना व पक्षकारांना होणार्या पार्किंगच्या समस्येबाबत जिल्हाधिकार्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर प्रश्न सोडवु असे आश्वासन दिले.
जिल्हा व सत्र न्यायालयालयाच्या नविन इमारतीचे रखडलेल्या बांधकामाबद्दल PWD अधिकार्यांशी काम लवकरात लवकर चालु करण्याबाबत येणाऱ्या अडचणींची चर्चा केली.
वकिलांच्या चेंबर व बार असो हॉलमधील वीज बील हे कमर्शीयल पध्दतीने न आकारता रेसीडेंशीयल पध्दतीने आकारणीबाबत तात्काळ (MSEB)वीज वितरण अधिकार्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर कमर्शियल कनेक्शन चे रुपांतर रेसीडेंशियल करण्याबाबत पाठपुरावा करावे असे सांगितले.

वकिलांवर होणारे हल्ले थांबण्याकरिता व संरक्षणाच्या अनुषंगाने संसद अधिवेशनात वकिल संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्याकरीता प्रयत्न व आवाज उठवण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी सोलापुर बार असोशिएशन अध्यक्ष अध्यक्ष ॲड. अमित आळंगे,उपाध्यक्ष ॲड. व्ही.पी.शिंदे,सचिव ॲड.मनोज नागेश पामूल,सहसचिव ॲड.निदा सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे तसेच जेष्ठ विधीज्ञ ॲड.व्हि.एस आळंगे, ॲड. कोथिंबीरे, ॲड.सुतार, ॲड.विक्रांत फताटे, ॲड.परमानंद जवळकोटे,ॲड रफिक शेख , ॲड.शुभम माने,ॲड गुरव,ॲड भिमाशंकर कत्ते,ॲड सहदेव भडकुंबे ॲड.बशिर शेख, ॲड शहानवाज शेख ,ॲड शिवाजी कांबळे, ॲड बसवराज स्वामी यांच्यासह इतर विधीज्ञ हजर होते.