श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.13 :- पुणे येथील भाविक विठ्ठल बाबुराव मेंदनकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष 111 रुपयाची देणगी दिली.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समिती चे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांच्या हस्ते देणगीदाराचा श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदिर समितीचे लिपिक योगेश कागदे व देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.