प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे
तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांच्या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे यांचे गौरवोद्गार
म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज –म्हसवड ता.माण येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी.तलाठी हा शासन आणि सामान्य नागरिक यांना जोडणारा दुवा असतो आणि त्यांनी चांगले काम केले तरच खऱ्या अर्थाने जनसामान्यांना न्याय मिळणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे यांनी सांगितले.

या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तलाठीपदी नेमणूक झालेले यश ढोले यांचा शाल व भेटवस्तू देऊन समाजिक कार्यकर्ते व मा.आमदार जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी बाळासाहेब पिसे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तलाठी परीक्षा पास झालेले यश यांनी एवढ्यात न थांबता आणखी प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पदे मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.अहिंसा पतसंस्था व नितिन दोशी हे फक्त बँकिंग न करता यशस्वी झालेल्या प्रत्येक घटकाच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी त्यांचा गुणगौरव करण्यासाठी अव्वल स्थानी असतात.आहेत.
म्हसवडचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी म्हणाले की,यश ढोले यांची तलाठीपदी नेमणूक झाली ही म्हसवड वासियांसाठी अभिमानाची व कौतुकाची गोष्ट आहे.जे नाही ललाटी ते करी तलाठी.तलाठी हा प्रशासन व नागरिक यांच्यातील मुख्य दुवा असलेने त्यांनी इमाने इतबारे जनतेची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्कार मूर्तींच्या भाषणात यश ढोले म्हणाले की,नितिन काकांनी यशस्वितांच्या केलेल्या सत्कारांच्या बातम्या बघून मला यातून खूप प्रेरणा मिळायची आणि मी मनात ठरवलेलं की नितिन काकांना आपला सत्कार करण्याची संधी द्यायची आणि ती वेळ आली आणि मी ते काकांच्या प्रेरणेने करून दाखवलं याचं खूप समाधान आहे.

या कार्यक्रमप्रसंगी अहिंसा पतसंस्थेचे संचालक अनिल गाडे, माजी नगरसेवक संग्राम शेटे,विनोद रसाळ,चेतन ढवण, शिवाजी जाधव,सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अजीम तांबोळी,सुरज करमाळकर, रिलस्टार ऋषिकेश देशमुख,चरण माने, प्रवीण केवटे,आमदार कलेक्शन चे मालक तुषार शेंडगे, निखिल माळी, सागर नामदे , संस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ,कर्मचारी व अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.आभार अक्षय धट यांनी मानले.
अहिंसा पतसंस्था ही फक्त कर्जच वाटत नाही तर प्रेमही वाटत असते.एखादाचं चांगले झालेले त्यात आनंद वाटणारा थोडेच असतो त्यापैकी एक म्हणजे आपले नितिन दोशी हे आहेत – जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे