राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विघ्नेश जवळेकर याचे घवघवीत यश …
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसन्न फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ पुरस्कार वितरण राज्यस्तरीय ए.टी.एस.परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अकलूज स्मृतीभवन येथे संपन्न झाला.यात राज्य स्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत विघ्नेश ज्ञानेश्वर जवळेकर याचा केंद्रात दुसरा व राज्यात अकरावा नंबर आला तसेच तन्वी भाग्यवंत माने हिचा केंद्रात तिसरा तर राज्यात बारावा नंबर आला आहे.

यावेळी कुणाल काळे विद्यानिकेतन अकॅडमी इंदापूर, गटविकास अधिकारी श्री देशमुख,नवनाथ धांडोरे अध्यक्ष प्रसन्न फाउंडेशन, सुनील लिगाडे सर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष -पालक ज्ञानेश्वर जवळेकर, सौ. अनुराधा जवळेकर,भाग्यवंत माने तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळवे सौ. सारिका वडवकर मॅडम,शरद काळे सर, मुख्याध्यापक भोसले सर यांचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.