मा. अभिजित पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी प्रामाणिक खूप खूप शुभेच्छा
घरंदाज, खानदानी, तालेवार कुटूंबातील आपुलकीचा परिस अभिजित आबासाहेब पाटील यांच्या जीवनावरील ४१ व्या वाढदिवसानिमित्त अग्रलेख
श्री.आबासाहेब यांचे आजोबा श्री.कै. विठ्ठलराव भिमराव पाटील यांच्याकडे पवित्र आपुलकीची व माणूसकीची पोलीस पाटीलकीच्या कामगिरीचे काम सेवानिवृत्त होईपर्यंत होते व त्यांचे आजोबा यांचेकडून इतर अनेक गावचा चार्ज असतानाही पोलीस अधिकाऱ्यामार्फत मोडी बाराखडीचे शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना गृहखात्यामार्फत योग्य पध्दतीचा समतोल व समन्वय ठेवून न्याय दिल्याचे मी आत्तापर्यत आत्मसात केलेले आहे. तसेच आबासाहेबांचे पिताश्री थोर कायदे पंडीत कै.धनंजय विठ्ठलराव पाटील यांनीसुध्दा तालुका न्यायालय,ना.जिल्हा न्यायालय, ना.हायकोर्ट न्यायालय मुंबई, ना. सुप्रिम कोर्ट दिल्ली यांच्यामार्फत कायद्याचा परिपूर्ण दिवाणीचा व फौजदारीचा अभ्यास असल्याने व सर्व कायद्याचे कलमे तोंडपाठ असल्याने अनेक वादी व प्रतिवादी व फिर्यादी व आरोपी यांना मोफत पदरमोड करुन न्याय दिलेला आहे. त्याच पूण्याच्या जोरावर निती निसर्गाचा मालक परमेश्वर यांनी अभिजीत धनंजय पाटील व अमरजित धनंजय पाटील या रामलक्ष्मण जन्माला घातले आहेत.

अमरजित पाटील हे सुध्दा पाच साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एम.डी.) म्हणून चौफेर व्यक्तिमत्वाचे योगदान प्राप्त करुन गुडविल निर्माण केलेले आहे. श्री.आबासाहेब यांनीसुध्दा शेकडा १०० टक्के नागरिकांपैकी ५ ते १० टक्क्याने त्रास द्यायचे ठरवून दिलेला तो त्रास सोसून सन २०१७ मध्ये मराठवाड्यातील धाराशिव जिल्हामध्ये चोराखळी येथे पहिला साखर कारखाना विकत घेवून तो तीनच सिझनमध्ये नफ्यात आणून तो कर्ज मुक्त केला.२०१८- १९ मध्ये नांदेडमध्ये व २०१९-२० मध्ये नाशिकमध्ये २०१९-२० मध्ये सोलापूर मधील सांगोला व २०२०-२१ मध्ये बीड जिल्ह्यामध्ये तसेच २०२२-२३ मध्ये प्रत्येक खेडेगावाने तालुक्याने जिल्ह्याने अखंड महाराष्ट्रातील व अखंड भारतातील साखर कारखानदारीचा अभ्यास असणाऱ्या भारतीयांनी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा बंद पडून मोडकळीला आलेला कारखाना, उद्योगपतींनी लिलावात घेण्यास पात्र असणारा कारखाना या निर्णयावर न्यायालयाचा स्टे घेवून,निवडणूका लावून, निवडणुका जिंकून घेवून पहिल्या सिझन मध्ये ७,२६,००० टनाचे गळीत व दुसऱ्या सिझनमध्ये १०.८१ लाख टनाचे गळीत हंगाम घेवून जिल्ह्यामधील ऊसाची काटामारी थांबवून जिल्ह्यात प्रत्येक ऊसाच्या टनाचा दर वाढवून शेतकऱ्यांना गळीत ऊसासाठी थांबवून लांबवून जेरीला आणून सोडणाऱ्या स्वार्थी लोकांना योग्य पध्दतीचा इतिहास घडवून आणून दाखविलेला आहे.
आबासाहेबांनी भारत सरकारमधील शासन चालविणारे लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी तसेच महाराष्ट्र सरकार चालविणारे लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी व सर्व पक्षातील अग्रगण्य कार्यकर्ते व नेते ग्रामीण व शहरातील भारतीय नागरिक यांच्याशी संबंध सुध्दा आपुलकीचे व जिव्हाळ्याचे निर्माण केलेले आहेत.
त्यातच भर म्हणून आता भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी आपल्या अग्रगण्य श्री विठ्ठल कारखान्यावर जगाचे मालक विठ्ठल रखुमाई प्रसन्न असल्यामुळे ३४७ कोटी रुपयाला थकहमी दिली आहे. यामध्ये आबासाहेबांचे योग्य पवित्र पुण्यवान योगदान सभासदांच्या हितासाठी उपयोगात आले आहे.त्यातच आर्थिक भर म्हणून आबासाहेब हे चेअरमन म्हणून साखर कारखान्याचे गाडी वापरत नाही,डिझेल पेट्रोल घेत नाहीत. पूर्वीच्या लोकप्रतिनिधीं सारखा भत्ता घेत नाहीत अशा थोर व्यक्तिमत्वाकडे आपल्या दक्षिण काशी पंढरी नगरीमध्ये तीन संस्थापक होवून गेले, त्यांच्या विचाराचा व अनुभवाचा आर्थिक अर्क म्हणजे आबासाहेब पाटील हे आहेत. त्यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त माझ्या वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा मालक विठोबा व मला प्रसन्न असलेला कुलदैवत ग्रामदैवत भैरोबा या देवांकडे एवढीच मागणी करतो की, माझ्या आयुष्यातील काही वर्षे कमी करुन, आबासाहेब यांना आमदार नामदार होवून आयुष्य वाढवून द्यावे हि श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना.अग्रलेखातून आबासाहेबांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे.
श्री आबासाहेब यांना पुन्हा एकदा भोळ्या भाबड्या कमी शिक्षण घेतलेला सभासद म्हणून माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला विश्वासू सहकारी शेतकरी आज्ञाधारक विठ्ठल परिवार निर्मितीतील लहान घटक – दिनकर आदिनाथ चव्हाण आढीव