बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सभासदांनी मोठ्या विश्वासाने अभिजित पाटील यांच्याकडे दिला

अभिजित आबा पाटील यांच्या एकूणच वाटचालीचे वर्णन करायचे झाल्यास आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर असे करता येईल.धाराशिव,वसंतदादा पाटील सहकारी नाशिक आणि नांदेड येथील व्यंकटेश्वरा, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाने चालवण्यास घेतले आणि यशस्वी
चालवून दाखवले.

यातील सांगोला साखर कारखाना १२ वर्षे बंद होता तो दोन करून तिसरा हंगाम गत वर्षी पार केला.तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाल्याने बंद पडलेला असताना सभासदांनी मोठ्या विश्वासाने तो अभिजित पाटील यांच्याकडे दिला.आबांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवताना दोन वर्षे कारखाना यशस्वी चालवला आहे. चेअरमनपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या वर्षी ७ लाख २६ हजार टन तर दुसऱ्या वर्षी विक्रमी १० लाख ८० हजार टन उसाचे गाळप केले.शेतकऱ्यांना विक्रमी भाव दिला.

जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडून शेतकऱ्यांना प्रथमच ३ हजार रुपये प्रतिटन दर दिला.त्यामुळे वयाच्या चाळीशीत असतानाच अभिजित पाटील यांनी आजारी साखर कारखान्याचे डॉक्टर अशी उपाधी मिळवली आहे.आता बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी वेगात सुरू असून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल.

कोरोना काळात देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रातील साखऱ कारखानदारांना ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत तंत्रज्ञांना बोलवून त्यांच्या सोबत अहोरात्र थांबून अभिजीत आबांनी धाराशिव कारखान्यात अवघ्या काही दिवसात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प यशस्वी केला. त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली.राज्यातील सर्व नेतेमंडळींनी तर आबांच्या कार्याचा गौरव केलाच परंतु देशपातळीवर देखील अभिजीत आबांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

कारखानदारी करीत असतानाच कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव आणि नागरिकांचे रंजनातून प्रबोधन करण्याचे कार्य
अविरतपणे सुरू आहे. आतापर्यंत शिवपुत्र संभाजी हे महानाट्य,शिव महापुराण कथा,महिलांसाठी खेळ पैठणींचा, रमजान ईद वेळी मुस्लिम बांधवांना दुध उपलब्ध करून देणे, इफ्तार पार्टी करुन त्यात सहभागी होणे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालांचे आयोजन, महावीर जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जात असताना त्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवणे,दिवाळी फराळ,दांडिया स्पर्धा, गणेशोत्सव असे उपक्रमातून सतत जनसंपर्कांत असलेले अभिजीत आबा हे एक उत्साही उमदे नेतृत्व आहे.

श्री दिनकर आदिनाथ चव्हाण,आढीव जेष्ठ संचालक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना – विशेष लेख श्री अभिजीत धनंजय पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांच्या वाढदिवसानिमित्त