IND vs SL: भारताने श्रीलंकेचा दमदार सामन्यात पराभव करत मालिका 3-0 ने जिंकली



भारताने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. यासह भारतीय संघाने मालिका 3-0 अशी खिशात घातली. गौतम गंभीरचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर भारताचा हा पहिला विजय आहे.

 

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 137 धावा केल्या. अशा प्रकारे सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.

 

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी झाली.या सामन्यात हसरंगाने तीन, असलंकाने शून्य, रमेश मेंडिसने तीन, कामिंदू मेंडिसने एक, विक्रमसिंघेने चार*, महिश टेकशानाने शून्य आणि असिथा फर्नांडोने एक* धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

 

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघ या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. या सामन्यात शुभमन गिलने 39 धावा, शिवम दुबेने 13 धावा, रायन परागने 26 धावा, वॉशिंग्टन सुंदरने 25 धावा, मोहम्मद सिराजने शून्य धावा आणि रवी बिश्नोईने आठ* धावा केल्या. श्रीलंकेकडून महिष तेक्षानाने तीन तर वानिंदू हसरंगाने दोन गडी बाद केले. त्याचवेळी विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top