स्वच्छता,तपासातील गती आणि जनसुरक्षा बाबतीत समाधानकारक काम – एसपी अतुल कुलकर्णी

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली मंगळवेढा पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणी केले कामकाजाचे कौतुक

स्वच्छता,तपासातील गती आणि जनसुरक्षा या सर्व बाबतीत समाधानकारक काम- एसपी अतुल कुलकर्णी

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१२/ २०२५- आज मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.पोलीस निरीक्षक बोरिगिड्डे यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांसमवेत त्यांना मानवंदना दिली.

तपासणीदरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशनसह संपूर्ण परिसराची पाहणी करून स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि वर्षानुवर्षे प्रलंबित मुद्देमालाच्या निर्गतीबाबत समाधान व्यक्त केले.

तसेच शासनाच्या नव्या कायद्यानुसार गुन्हे 30/60/90 दिवसांत पूर्ण करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक करून अधिक परिणामकारक तपासासाठी मार्गदर्शन केले. सर्व अभिलेखांची चाचणी करून आवश्यक सूचना दिल्या.

उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे स्वतःच्या हस्ते अभिनंदन करून पुढेही अशीच कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले.बीट अंमलदारांना गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल सक्रिय करून गुन्हे नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून मनपरिवर्तनासाठी मार्गदर्शन करण्यात आले.अधिकारी- अंमलदारांची वृंदपरिषद घेऊन त्यांच्या अडचणी तत्काळ निकाली काढल्या.

त्यानंतर पत्रकार बंधूंसोबत बैठक घेऊन सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे LawEnforce 24 अ‍ॅपचे फायदे,CCTV लोकेशन,अपघातप्रवण क्षेत्रे,गुन्हेगारी नकाशे (क्राईम मॅपिंग) व जनसुरक्षेसाठी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Leave a Reply

Back To Top