आमदार अभिजीत पाटील यांचा पोलिस पाटील संघटनेच्या आंदोलनास ठाम पाठिंबा
मागण्यांबाबत त्वरित समाधानाची मागणी
पोलिस पाटीलांचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे- नागपुरात आमदार अभिजीत पाटील यांची जोरदार मागणी
नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज | डिसेंबर १०, २०२५-राज्यातील पोलिस पाटील यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आज भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला.

या भेटीदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की,पोलिस पाटील अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.पोलिस पाटीलांचे नुतनीकरण कायमस्वरूपी बंद करून त्यांचा सन्मान टिकून राहील अशी धोरणे लागू करावीत.

याशिवाय त्यांनी पुढील महत्त्वाच्या मागण्यांवर जोर दिला -पोलिस पाटीलांची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करण्याची मागणी
२०१९ पासून वारसांना अनुकंपा नियम लागू करणे
सेवानिवृत्तीनंतर २० लाख रुपये एकरकमी निधी देणे
पोलिस पाटील कल्याण निधी स्थापन करणे
१० वर्षे सेवा पूर्ण असणाऱ्यांना अंशकालिन गृह व महसूल विभागात समांतर आरक्षण
अतिरिक्त पदभार असलेल्या गावांना २५% अतिरिक्त मानधन
मानधन व प्रवास भत्ता दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत देणे
पोलिस पाटीलांना विमा कवच लागू करणे
त्यामुळे राज्यशासनाने तातडीने या आंदोलनाची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी ठाम भूमिका पाटील यांनी घेतली.
