अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे स्वेरीमध्ये उद्घाटन उद्या
उद्याच्या कार्यक्रमात दिल्लीतील मान्यवरांची उपस्थिती
नाविन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी स्वेरीत ACIC केंद्र सुरू
AIM समर्थित ACIC चे उद्घाटन; स्वेरी होणार इनोव्हेशनचे नवे केंद्र
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०८ डिसेंबर २०२५- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग sveri (ऑटोनॉमस) मध्ये उद्या मंगळवार, दि.०९ डिसेंबर रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (ACIC) चे भव्य उदघाटन होणार आहे. ही माहिती संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
सकाळी ०८:१५ वाजता स्वेरी कॅम्पसमध्ये हा महत्वपूर्ण कार्यक्रम पार पडणार असून अटल इनोव्हेशन मिशन (AIM), निती आयोग भारत सरकार समर्थित हे केंद्र उद्योजकता,स्टार्टअप्स आणि नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देणार आहे.

उदघाटन समारंभासाठी अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यक्रम प्रमुख प्रतीक देशमुख, नावीन्यपूर्ण उपक्रम प्रमुख वितस्ता तिवारी तसेच व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे महेश वैद्य आणि सौ.सुजाता नरसिंहन हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी भूषवणार असून सोबस इनसाईट फोरमचे दिग्विजय चौधरी आणि एआयएमचे दीपाक्षी जिंदाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ACIC केंद्रामधून उद्योजकतेला प्रोत्साहन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकास, स्टार्टअप इन्क्युबेशन आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. हर्षवर्धन रोंगे हे जबाबदारी पार पाडत आहेत.
