डॉ.जगदीशचंद्र कुलकर्णी यांच्या कार्यातून आंतरराष्ट्रीय वेदिक कॉन्फरन्समध्ये सोलापूरचा देशभर गौरव
Grand Felicitation of Poet-Writer Dr. Jagdishchandra Kulkarni in Delhi
Solapur’s Pride Honoured at International Vedic Conference in Delhi
संशोधन, साहित्य आणि संस्कृतीचा संगम – डॉ.जगदीशचंद्र कुलकर्णींचा सन्मान
पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोलापूरचा झेंडा दिल्लीमध्ये फडकला
नवी दिल्ली/सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – इंटरनॅशनल वेदिक कॉन्फरन्स, नवी दिल्ली (रोहिणी) येथे दि.30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 दरम्यान ज्ञान ज्योती समिती आणि आर्य सभा यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली.या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत सोलापूरचे प्रख्यात लेखक,कवी आणि संशोधक डॉ. जगदीशचंद्र कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

डॉ.जगदीशचंद्र कुलकर्णी यांनी स्वामी दयानंद सरस्वती और गोरक्षा या विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर करत प्रभावी भाषण केले. त्यांच्या सखोल संशोधन आणि विचारमंथनाचे कौतुक आयोजक समितीने उभे राहून केले.
त्यांचा सत्कार प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी (कुलगुरू, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी), सुरेशचंद्र आर्य (अध्यक्ष, अखिल भारतीय आर्य सभा) आणि सुरेंद्र कुमार आर्य (चेअरमन, ज्ञान ज्योती समिती) यांच्या हस्ते शाल, मोत्याची माळ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि केशरी फेटा देऊन करण्यात आला.

या सोहळ्याला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राज्यपाल आचार्य देवव्रत, तसेच सुधीर कुमार (JNU) या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कॉन्फरन्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.डॉ.कुलकर्णी यांनी यापूर्वीही हैदराबाद, पुणे, हरिद्वार, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, एरणाकुलम अशा विविध ठिकाणी झालेल्या 170 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला असून, साहित्यातील त्यांच्या कार्याचे सतत कौतुक होत आहे.

या यशाबद्दल प्रसाद कुलकर्णी (सेक्रेटरी), चंनय्या मेहत्रे (उपाध्यक्ष), अ.स. जोशी (सहसेक्रेटरी) – फ्रेंड्स सोसायटी आणि युनेस्को क्लब 101, दमानी नगर, सोलापूर यांनी अभिनंदन व्यक्त केले.
