शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले

शिवसंस्कार : पंढरपूरात बालकांच्या हातून साकारले शिवकालीन किल्ले

प्रेरणादिवाळी : मुलांच्या किल्ल्यांतून झळकला इतिहासाचा तेजोमय वारसा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि. 26 ऑक्टोबर 2025 – शिवप्रतिष्ठान पंढरपूरतर्फे दीपावली निमित्त किल्ले 2025 या उपक्रमांतर्गत पारितोषिक वितरण सोहळा जाधवजी जेठाबाई धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

पंढरपूर शहरातील 75 ते 80 विविध गटांतील मुला-मुलींनी ऐतिहासिक किल्ल्यांची बांधणी करून शिवकालीन परंपरेचा जागर जिवंत केला.यात कवठेकर प्रशालेच्या इयत्ता पाचवी तील कुमारी सुनीती नितीन कटप हिला लहान गटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.तिचा प्रमाणपत्र,ट्रॉफी व केशरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.घोडके,माऊली डांगे,सागर गावडे आदी मान्यवर तसेच पंढरपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम सर्व चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा देणारा आणि इतिहासाशी जोडणारा ठरला.

Leave a Reply

Back To Top