हास्याचा बादशाह असरानी यांचे स्मरण — पंचप्राणासारखा हरपलेला एक कलाकार

मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज –हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुगुणी अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.दीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी सिनेमाला अमूल्य योगदान दिलं — शोले तील विनोदी जेलरपासून ते धमाल मधील हसवणाऱ्या भूमिकांपर्यंत असरानी यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अमिट ठसा उमटवला.

त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक महान, विनोदी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत म्हटलं — परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं बळ देवो.
