सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन
माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ ऑगस्ट २०२५ – ३१ ऑगस्ट १९५२ या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या काटेरी तारेचे कुंपण तोडून अमानवी कायद्यातून मुक्त केले. त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागच्यावतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष युवराज जाधव यांच्या हस्ते झेंडा वंदन करून माजी महापौर अलकाताई राठोड यांच्या हस्ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला.

विमुक्त दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे व सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी विमुक्त समाजाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी भटक्या विमुक्त विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव म्हणाले, सन १९५२ मध्ये देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. सोलापूरा तील ९ समाजाच्या वस्तीतील नेते स्व.भीमराव जाधव गुरुजी, बोधक नगरकर, दादासाहेब मोफरे आणि इतर सहकाऱ्यांनी पंतप्रधान नेहरूंची भेट घेऊन सेटलमेंटमधील जीवन व अन्यायकारक परिस्थिती याची सविस्तर माहिती दिली.

या भेटीनंतर पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. त्या सूचनेनुसार तत्कालीन समाजकल्याण मंत्री जी.डी.तपासे यांनी सोलापूर येथील सेटलमेंटची माहिती घेत तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या आदेशानुसार, काटेरी तारांच्या कुंपणातील ओपन जेलमध्ये डांबून ठेवलेल्या ९ समाजाला मुक्त केले. त्यानंतर देशभरातील ५२ सेटलमेंट्स दि.३१ ऑगस्ट १९५२ रोजी मुक्त करण्यात आल्या.हा ऐतिहासिक दिवस देशभरात भटके विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी VJNT जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश ज.सेक्रेटरी अलकाताई राठोड, VJNT प्रदेश उपाध्यक्ष प्रा.भोजराज पवार, सचिव मोतीराम चव्हाण,डि ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे ,महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, संजय गायकवाड,प्रकाश माने, रमेश जाधव, बालाजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, बाबूराव जाधव ,अंबादास जाधव, निशा मरोड, कमरूनीसा बागवान ,चंदाताई काळे ,संतोष गायकवाड, सुभाष वाघमारे ,रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड,हनमंतू रूपनवर,शिवाजी साळूंखे, दसरथ सामल रेहमान शेख,शिकुर शेख ,संजय कुराडे,मुदस्सर बिराजदार,माशाळ मुल्ला,जब्बार शेख,अभिलाष अचुकोटला, दिपक मड,इब्राहिम अत्तारवाले आदि उपस्थित होते.
