वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईकनवरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशाला येथे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून फुल ना फुलाची पाकळी म्हणून सचिन नाईकनवरे मित्र परिवाराच्यावतीने क्रीडा साहित्य वाटपाची संकल्पना घेऊन प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्य करण्याचा संकल्प धरूनच आज त्याची सुरुवात करून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सचिन नाईकनवरे यांनी क्रीडा साहित्याचे विद्यार्थ्यांना वितरण केले.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश उपासे, शाळेचे अध्यक्ष शंकर मलशेट्टी,खजिनदार नंदकुमार पाटील, युवा नेते बालाजी जवळेकर, विक्रम मगर, बालाजी उपासे, राधेश्याम पाटील, विकास उपासे, अशोक नाईकनवरे, स्वप्निल राऊत,सचिन जवळेकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक शिद सर, साबळे सर,जाधव सर,जवळेकर सर,बाबर सर, नाईकनवरे सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन डी देशमुख सर यांनी केले.आभार पाटील सर यांनी मानले.