पंढरपूरात सार्वजनिक ठिकाणी डाॕल्बी सिस्टीम वापरावर बंदी घाला – यशवंत डोंबाळी

पंढरपूरात सार्वजनिक ठिकाणी डाॕल्बी सिस्टीम वापरावर बंदी घाला – यशवंत डोंबाळी

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने असंख्य वयोवृध्द भाविक,लहान मुलं देवदर्शनासाठी येत असतात.पंढरपूर शहरात सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम , मिरवणूका तसेच लग्नसमारंभाप्रसंगी डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे.या डॉल्बी सिस्टीमचा आवाज जोरात सोडलेला असतो.त्यावेळी पोलीसांचेही दुर्लक्ष होते कारण प्रत्येक ठिकाणी पोलिस उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि डॉल्बी सिस्टीमवाले या कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडून आवाज जोराचा ठेवतात. त्यामुळे शहरातील उच्च रक्तदाब,ह्दयरूग्ण, वयोवृध्द नागरिक व लहान मुलांनाही त्रास सहन करावा लागतोय.

त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये डाॕल्बी सिस्टीम वापरावर तात्काळ कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Back To Top