थोर समाजसेविका रमाबाई रानडे


Ramabai-rande

भारतभूमीला जसे अनेक संत लाभले आहे त्याचप्रमाणे थोर समाजसेवक देखील लाभले आहे. काहींनी भारताला स्वातंत्र मिळावे म्हणून अथांग प्रयत्न केले. तर काही समाजसुधारकांनी भारतात चालत असलेल्या कृप्रथा बंद व्हाव्या म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. स्वतंत्र पूर्वीचा काळ असा होता की त्यावेळेला स्त्रीला उंबरठा ओलांडून जाण्याची परवानगी न्हवती, तसेच सती जाणे, केशवपन, बालविवाह यांसारख्या भयानक प्रथांना स्त्रीला सामोरे जावे लागत होते. अश्याच वेळी काही महिला समाज सुधारकांनी या भारत भूमीमध्ये जन्म घेतला. व समाजातील स्त्रीला साक्षर बनवण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, बहिणाबाई चौधरी यांसारख्या अनेक स्त्री समाजसुधारकांचे अनमोल योगदान भारतभूमीला लाभले. 

 

भारतवर्षातील एक थोर स्त्री समाजसुधारक होत्या रमाबाई रानडे. महिलांना त्यांचे अधिकार मिळावे, महिलांनी शिक्षण घ्यावे याकरिता देखील रमाबाई रानडेंनी अथांग प्रयत्न केले. रमाबाई रानडे या “सेवा सदन” संस्थापक आणि अध्यक्ष होत्या. या संस्थानात हळूहळू अनेक महिलांनी भाग घेतला.  

 

अश्या या समाजसेविका रमाबाई रानडे यांचा जन्म 25 जानेवारी 1863 मध्ये कुरलेकर कुटुंबात झाला. एक भारतीय समाजसेवी म्हणून आणि 19 व्या शतकात पहली महिला अधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच वयाच्या 11 वर्षी त्यांचा विवाह महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत झाला होता. जे एक प्रतिष्ठित विद्वान आणि समाजसुधारक होते. महादेवरावांनी लहानश्या रमाबाईंना समजून घेतले व त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यांना साक्षर केले. तसेच महादेवरावांनी रमाबाईंना मराठीचे ज्ञान देत इंग्रजी आणि बंगालीमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी अथांग मेहनत घेतली. महादेवराव रमाबाईंच्या पाठीशी कायम उभे राहिले. पण एवढे सोपे नव्हते त्यावेळी स्त्रीला घराबाहेर पडून शिक्षण घेणे. अनेक संकटांचा सामना करीत रमाबाई शिकल्या. महादेवरावांची सुंदर विचारधारा, प्रगतशील दृष्टि, भावनिकता आणि समर्पित सामाजिक प्रतिबद्धता तसेच देशाबद्दलचे प्रेम याने रमाबाई यांना प्रेरणा मिळाली व भविष्यात समाजसेविका बनण्यासाठी समाजासाठी कार्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.

 

थोर समाजसेविका रमाबाई रानडे या पहिल्यांदाच नाशिकमधील शाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. तसेच महादेवरावांनी त्यांना भाषण लिहून दिले होते. रमाबाई लहानपणा पासूनच हुशार होत्या त्यामुळे त्यांनी बंगाली आणि इंग्रजी भाषा लागलीच आत्मसात केली. तसेच रमाबाई भाषण करायच्या तेव्हा ऐकणारा भारावून जायचा. नंतर त्यांनी मुंबईमध्ये प्रार्थना समाजासाठी काम करायला सुरवात केली. नंतर त्यांना आर्य महिला समाज्याच्या एका शाखेची स्थापना करीत 1893 ते 1901 सामाजिक कार्य करीत लोकप्रियता मिळवली. तसेच यांनी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी वर्ग उघडले. त्यामध्ये भाषा ज्ञान, शिवणकाम यांसारखे अनेक कामांचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले. ज्यामुळे महिला सक्षम बनू लागल्या. अश्या या थोर संजसेविकाची प्राणज्योत 25 मार्च 1924 मध्ये वयाच्या 61 वर्षी मावळली. 

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top