गुटखा वाहतुक गुन्ह्यातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस पालघर पोलीस दलाकडून अटक

गुटखा वाहतुक गुन्ह्यातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस पालघर पोलीस दलाकडून अटक

तलासरी पोलीस ठाणेच्या पोलीस पथकाची उत्कृष्ट कामगिरी

तलासरी जि.पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज – तलासरी पोलीस ठाणे हद्दित दि.०७/०७/२०२५ रोजी पहाटे ०३.२० वाजताचे सुमारास हिवाळ पाडा, तास्कंद हॉटेलसमोर, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर, मुंबईकडे जाणाऱ्या बाजूवर ता. तलासरी जि. पालघर येथे क्रेटा कार क्र. MH-02-EU-6632 हिस थांबण्याचा इशारा केला असता दोन अज्ञात इसम हे गाडी सोडून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले होते. त्यामूळे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला एकूण ४,०५,९६४/- रूपये किंमतीचा तंबाखूजन्य (गुटखा) पदार्थ व नमूद कार असा एकूण १६,०५,९६४/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात आरोपींविरूध्द तलासरी पोलीस ठाणे येथे ११६/२०२५ भा. न्या. सं. कलम १२३,२२३,२७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधि. २००६ कलम २६(२) (अ), २७ (२) (ई), ३० (२) सह मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील अधिसुचना शुक्रवार जुलै १२,२०२४/आषाढ २१ शके १९४६ दि.१२/०७/२०२४ रेग्युलेशन २०,२,३,४ ऑफ फुड सेप्टी & स्टेडड-२०११, ३,१,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमूद गुन्ह्याचा तपास हा वरीष्ठांचे मागदर्शनाखाली पोउपनि/जी.एस. कांबळे व तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस पथक हे करीत होते. सदर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपणीय माहितीच्या आधारे नमूद गुन्हयात आरोपी १) नामन रहमान शेख, रा. मनोर, ता जि. पालघर व २) नाजिम रफिक सिध्दीकी, वय ३४ वर्षे, रा. आंबेडकर नगर, मनोर, ता. जि. पालघर यांना निष्पन्न करुन आरोपी नामन रहमान शेख यास दिनांक १०/०७/२०२५ रोजी अटक करण्यात आले होते. तसेच आरोपी नाजिम रफिक सिध्दीकी हा फरार होता. सदर आरोपीचा देखील तांत्रिक पध्दतीने शोध घेऊन दि.३०/०७/२०२५ रोजी त्यास अटक करण्यात आले आहे. नमूद आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायालय, डहाणु येथे हजर केले असता ०४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपी नाजिम रफिक सिध्दीकी याचेवर अवैध गुटखा वाहतुक प्रकरणी तलासरी पोलीस ठाणे व मनोर पोलीस ठाणे येथे ३ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधिक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड, पोउपनिरी/जी. एस. कांबळे, पोउपनिरी/विकास दरगुडे, पोहवा/५५४ संदीप नांगरे, पोशि/१६० योगेश मुंढे, सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top