सोलापूरात ब्राह्मण वधू-वर मेळावा
पंढरपूर / अमोल कुलकर्णी /ज्ञानप्रवाह न्यूज- ब्राह्मण महासंघ पुणे संचलित मैत्रेयी वधुवर सुचक केंद्र सोलापूर व शासनमान्य परवाना क्रमांक ७२/ २२ ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परांडा जि.धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ब्राह्मण समाजातील वधुवर यांच्यासाठी येत्या शनिवारी दिनांक 27 जुलै रोजी राज्यस्तरीय ब्राह्मण वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी राज्यातील ब्राह्मण समाजातील वधुवर यांची उपस्थिती आवश्यक आहे मेळाव्याचे ठिकाण शिवस्मारक सभागृह भागवत टॉकीज जवळ सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्व वधुवर यांना सहभागी वधुवर याची माहिती असणारी एक पीडीएफ फाईल वैयक्तिक नंबरवर दिली जाईल.नोंदणी फी 500 रु आहे.
असे ब्राह्मण महासंघ सोलापुरच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.सदर मेळाव्यात सर्व शाखीय ब्राह्मण पदाधिकारी, व्यावसायिक,उद्योजक यांचेसह ब्राह्मण महासंघचे आनंद दवे व सर्व सहकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष प्रवीण शिरसिकर,जिल्हाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी दिली आहे.