वीर धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना
ज्ञानप्रवाह न्यूज ,ता : 26/07/2024 वेळ : सकाळी 05.15 वाजता
वीर धरण,ता.पुरंदर जि.पुणे धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी 579.24 मीटर झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 55644 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता तो कमी करून 41733 क्युसेस इतका करण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.तसेच सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी ही संबंधितांची राहील असे कार्यकारी अभियंता
नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी कळविले आहे.