पत्रकारांना बरोबर घेऊनच विकास साधता येईल-न.पा. मुख्याधिकारी महेश रोकडे

पत्रकारांना बरोबर घेऊनच विकास साधता येईल-पंढरपूर न.पा.मुख्याधिकारी महेश रोकडे

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- मराठी पत्रकार संघ पुणे महाराष्ट्र राज्य आयोजित पंढरपूर पत्रकार पदाधिकारी नियुक्ती सोहळा पंढरपूर येथील पत्रकार भवन मध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पंढरपूर नगरपालिका नूतन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पंढरपूर शहर विकासाबाबत माहिती दिली.आषाढी वारीच नव्हे तर चारही वाऱ्या व नित्य येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा कशा देता येतील यासाठी सर्व पत्रकार सहकाऱ्यांना बरोबर घेऊनच कार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले.तसेच अनेक वर्षे रेंगाळत असलेला पत्रकार गृहनिर्माण प्रश्न लवकरच बैठक घेऊन मार्गी लावण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठी पत्रकार संघाचे किरण जोशी यांनी पुढील वर्षांपर्यंत आपल्या सर्व बांधवांच्या घरांची पायाभरणी झालेली असेल त्यासाठी शासन स्तरावर येणाऱ्या सर्व अडचणी सोडवून संघ भावना जागृत ठेवण्याचे सूतोवाच केले. पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांना सर्व मोफत उपचारासाठी पुणे येथे दवाखान्यात सोय करणार असल्याची माहिती दिली.

यावेळी जेष्ठ पत्रकार महेश खिस्ते यांनी उपस्थित नवोदित पत्रकारांना पत्रकारिता हे व्रत आहे ते टिकवणे काळाची गरज आहे असे सांगितले.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे सचिव शिबु नायर,महाराष्ट्र प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज बिबवे आदी उपस्थित होते.यावेळी नूतन शहर अध्यक्ष पदी दिनेश खंडेलवाल,शहर सहअध्यक्षपदी विनोद पोतदार, उपाध्यक्षपदी नवनाथ खिलारे,सचिवपदी अपराजित सर्वगोड तर तालुकाध्यक्षपदी मिलिंद यादव,उपाध्यक्षपदी अमोल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.

सर्व पदाधिकार्यांना ओळखपत्रे वाटप करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ प्रक्षाळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल कुलकर्णी यांनी केले.यावेळी विकास पवार,दत्ता पाटील,ज्ञानेश्वर शिंदे,संजय कोकरे,विकास सरवळे,महालिंग दुधाळे, बालम मुलाणी,राजू बाबर आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.सर्व नूतन पदाधिकारी यांची लवकरच बैठक होऊन पुढील वाटचाल ठरवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Back To Top