न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली शाळेमध्ये मोठ्या उत्साहात नवगतांचे स्वागत व संगणक कक्ष उद्घाटन कार्यक्रम संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली शाळेमध्ये मोठ्या उत्साहात नवगतांचे स्वागत व संगणक कक्ष उद्घाटन कार्यक्रम संपन्न

उत्रौली / ज्ञानप्रवाह न्यूज- न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली शाळे मध्ये मोठ्या उत्साहात नवगतांचे स्वागत व संगणक कक्ष उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी मकरंद गजांकुष (हृतिका enterprises ) राहणार – मोशी पुणे यांचा मूळ व्यवसाय – इंडस्ट्रिअल प्रोजेक्ट वर्क आणि विश्वास तांबे (MSW) जीवन कौशल्य प्रशिक्षक, विद्यार्थी आणि युवा समुपदेशक राहणार विश्रांतवाडी पुणे उपस्थित होते.

मकरंद गजांकुष यांनी शाळेसाठी कलर काम व पत्रे दिले. इयत्ता आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके, वह्या दिल्या व विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या इतर सुविधा देण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमप्रसंगी उत्रौली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भरत शिवतरे,उत्रौली गावचे माजी सरपंच भगवान शिवतरे व गावचे पोलीस पाटील श्री.कुंभार, सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम, प्राध्यापक पत्रकार दीपक एडवे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत धनावडे सर यांनी केले. स्वागत श्री.कंक सरांनी केले.भरत बापू व तांबे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी मानले.

या कार्यक्रमाला शाळेच्या मोरे मॅडम,योगेश घोणे सर, शिपाई पवार काका आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top