आमदार समाधान आवताडे यांचे सामाजिक क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रातदेखील महत्वपूर्ण योगदान

आमदार समाधान आवताडे यांचे सामाजिक क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रातदेखील महत्वपूर्ण योगदान

सी.एस.आर.फंडातुन दिला स्वेरीसाठी रु. २० लाखांचा निधी

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२५ : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी स्वेरीतील शैक्षणिक उपक्रमांना हातभार लावत स्वेरीसाठी रु.२० लाखांचा निधी दिला असून यापैकी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी रु.१६ लाख आणि एमबीए विभागासाठी रु. ४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार आवताडे हे सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रात देखील महत्वपूर्ण योगदान देत आहेत.

गोपाळपूर ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात इलेक्ट्रिक व्हेईकल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली असून या उपक्रमात एस.एम.आवताडे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे.या सेंटर ऑफ एक्सलन्स च्या स्थापनेसाठी आणि मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) विभागाच्या स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स (एस.पी.एस.एस) सॉफ्टवेअरसाठी श्री.एस.एम. आवताडे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एकूण रु.२० लाखांचे आर्थिक सहाय्य मिळाले असून, हा उपक्रम समाजहितासाठी तांत्रिक शिक्षणात प्रत्यक्ष गुंतवणुकीचा आदर्श ठरतो. सामाजिक बांधिलकीतून शिक्षण क्षेत्रात हातभार लावत आमदार आवताडे यांनी विद्यार्थ्यांसाठी उच्चस्तरीय प्रयोग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उदघाटन माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ.एन.बी.पासलकर व श्री एस.एम.आवताडे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक व उद्योजक संजय आवताडे यांच्या हस्ते झाले.या सेंटर ऑफ एक्सलन्समुळे आता विद्यार्थी थेट इलेक्ट्रिक वाहनांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रयोग करू शकणार आहेत.यासाठी बेंगळुरू मधील प्रसिध्द असलेल्या डेसिबल्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अत्याधुनिक मशीन्स बसविण्यासाठी तांत्रिक योगदान दिले आहे.या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेसाठी स्वेरीच्या प्रा.डी.डी.डफळे व प्रा.मंजीत कुमार यांना बेंगळुरू मध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्य डॉ.मिनाक्षी पवार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.एम.पवार यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख डॉ.बादल कुमार, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए.तंबोळी व प्रा.एस.एस.कवडे यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स साठी परिश्रम घेतले. आमदार आवताडे यांचे हे सामाजिक योगदान शिक्षण क्षेत्रात निश्चितच प्रेरणादायी ठरून इतर उद्योजकांनाही अशाच सकारात्मक उपक्रमांसाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे. सी.एस. आर. फंडातुन स्वेरीसाठी रु. २० लाखांचा निधी दिल्याबद्धल संचालक व उद्योजक संजय आवताडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी शास्त्रज्ञ डॉ.व्ही.के.सुरी,संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे,संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे,एच.एम.बागल, प्रा.सुरज रोंगे,संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी. केने आदींसह प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top