मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागा कडून विविध वैयक्तीक योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी पंचायत समिती मंगळवेढा येथील समाजकल्याण विभागाकडून विविध वैयक्तीक योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा येथे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत समाजकल्याण विभागाकडून सन 2025-26 या वर्षाकरीता 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी व 5 टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन आदि वैयक्तीक ग्रामीण भागातील दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थी योजनांचे अर्ज स्विकारले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी दिली.

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग या अंतर्गत सन 2025-26 या सालासाठी मागासवर्गीय कल्याण निधी 5 टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे.यासाठी मागासवर्गीय व अपंग व्यक्तीनी छापील नमुन्यात व अन्य कागदपत्रासह अर्ज करावेत.यासाठी जातीचा दाखला,एक लाखा पेक्षा कमी उत्पन्न,ग्रामसभेचा ठराव, बँक पासबुक, आधार, रेशनकार्ड, अपंगानी 40 टक्के च्या पुढे दिव्यांग असलेले प्रमाणपत्र आदि कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. यामध्ये मागासवर्गीयाना 20 टक्के योजनेत शेळी गट (4 शेळया व एक बोकड), मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एमएससीआयटी प्रशिक्षण, टॅली प्रशिक्षण, महिलांना शिलाई मशीन खरेदी करीता अनुदान, महिलांना मल्टी पर्पझ पल्वरायझर मशीन खरेदी करीता अनुदान, झेरॉक्स मशीन करीता अनुदान,महिलांना सोलर ड्रायर/डिहायड्रर मशीन खरेदी अनुदान,दिव्यांगाना- शेळीगट (4 शेळया व एक बोकड), झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, दिव्यांग स्वयंसहाय्यता समुहांना अर्थसहाय्य,दिव्यांगांना ई मोशन व्हेईकल आदि साहित्याचे वैयक्तीक वाटप करण्यात येणार असून मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयातील समाजकल्याण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक किशोर सातव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच विविध योजनांचे फॉर्म सर्व ग्रामपंचायतींना पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Back To Top