आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन संपन्न

आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन संपन्न

गेल्या अनेक वर्षांच्या पाणी प्रश्नाला आमदार आवताडे यांच्या माध्यमातून पूर्णविराम

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह प्रतिनिधी –शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगळवेढा येथे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या पाण्याचे पूजन आ.आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून येथे कौशल्यपूरक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पिण्याचे तसेच इतर वापर योग्य पाणी नसल्यामुळे संबंधित संस्था प्रशासनाने आमदार आवताडे यांची भेट घेऊन सदर पाणी प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती.

या संवेदनशील मागणीची दखल घेऊन आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून कॉलेज प्रांगणात पिण्यासाठी, स्वच्छता गृहांसाठी, झाडांसाठी तसेच इतर वापरयोग्य सुविधांसाठी अखेर मुबलक पाणी उपलब्ध झाले असून त्या पाण्याचे जलपूजन आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते करण्यात आले.

यापुढील काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि अपेक्षित कौशल्य विकासासाठी कोणत्याही आपण निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगून स्वतःला सिद्ध करत उराशी असणारे स्वप्न साकार करण्यासाठी मोठे प्रयत्न उभे करा असा मुलमंत्र आ.आवताडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य प्रा.डॉ.सुभाष कदम सर,माजी संचालक विजय माने, मुख्याध्यापक जयराम आलदर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, प्रा.राहुल आवताडे आदी मान्यवर सहकारी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top