खर्डी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न
खर्डी येथे चार कोटींची कामे

पंढरपूर /अमोल कुलकर्णी- जिल्हा नियोजन निधी,विविध वित्त आयोगातील ,आमदार फंड,खासदार फंडातून वाड्या वस्त्यांना जाणारे रस्ते,समाज मंदिरे,पाणंद रस्ते विठ्ठल मंदिर आणि अनेक कामांचे भूमिपूजन व पूर्तता लोकार्पण कार्यक्रम खर्डीत पार पडला.जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सर्व उद्घाटन कार्यक्रम पार पडले.

यामध्ये गगनगिरी रस्ता,पठाण वस्ती अंगणवाडी,काळा खोरा रस्ता,जिप शाळा सुशोभीकरण,खताळ वस्ती रस्ता,कोळी मळा रस्ता, शिरभावी रस्ता ते मेटकर वाडी रस्ता,गावातील रस्ता, पाटील वस्ती रस्ता, घाडगे वस्ती रस्ता,पेव्हर ब्लॉक बसवणे, विठ्ठल मंदिर पूर्तता कामांचे जवळपास 16 रस्ते आणि इतर चार कोटी रुपयांची कामे पूर्तता व शुभारंभ कार्यक्रम असे 17 कामे आयोजन करण्यात आले होते.यावेळी युवा नेते प्रणव परिचारक,सरपंच मनीषा सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे,कृषी उत्पन्न सदस्य महादेव लवटे,दादा मोटे, शिवाजी कृष्णा रोंगे,सीताराम रोंगे,रमेश हाके,संतोष कांबळे, अनिल चव्हाण,अमोल रोंगे,हणमंत पाटील, भारत माळी, कल्याण जाधव आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता सीताराम महाराज मठामध्ये करण्यात आली.