सोलापूर लोकसभा नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील तावशी,एकलासपूर,सिध्देवाडी येथील गावभेट दौरा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 जुलै 2024 – लोकसभा निवडणुकीत माय बाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून तावशी, एकलासपुर, सिद्धेवाडी गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.

याप्रसंगी युवा नेते भगीरथ भालके,शिवसेना नेते संभाजी शिंदे, संदीप पाटील, मनोज यलगुलवार, मिलिंद भोसले, योगेश ताड, किरण घाडगे, आदित्य फत्तेपूरकर, अमर सूर्यवंशी, योगेश ताड, अमोल कुंभार, गोकुळ जाधव, बाबा जाधव, दादा ताड, बिभीषण जाधव,संजय यादव,बाळासाहेब यादव,संदीप शिंदे, नितीन शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
