आटपाडीच्या अनिता पाटील भविष्यातल्या आमदार, नामदार – सौ राबीयाँबसरी व सादिक खाटीक
आटपाडी / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – आटपाडीच्या अभियंता सौ अनिता विजय पाटील या भविष्यातल्या आमदार, नामदार होण्याची पात्रता असणाऱ्या लक्षवेधी, धाडशी,जिगरबाज सकारात्मक उर्जेचे भांडार असणाऱ्या तरुण महिला आहेत, असे गौरवोदगार आटपाडी ग्रामपंचायतीच्या शिक्षण, पाणीपुरवठा समितीच्या माजी उपाध्यक्षा सौ राबीयाँबसरी सादिक खाटीक आणि सादिक खाटीक या दांम्पत्याने काढले .
मोठ्या गंभीर आजारावर यशस्वी मात करून पूर्ववत कार्यरत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला विभागाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षा अभियंता सौ अनिता पाटील यांचा त्यांचे निवासस्थानी जावून सौ राबीयाँबसरी सादिक खाटीक यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ घालून शुभेच्छा दिल्या .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष तथा कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, सौ.अनिता पाटील यांचे अभियंता पती विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय कर्णे,सौ.शीतल संजय कर्णे, कु श्रीमयी कर्णे, सौ.अनिता पाटील यांचे बंधू समाधान पाटील,मातोश्री श्रीमती शोभाताई पाटील उपस्थित होत्या.