अभिनेता शाहरुख खानला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
मुंबई – अभिनेता शाहरुख खानला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवारी, महोत्सवाच्या आयोजकांनी ही बातमी शेअर केली आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना, जिओना ए. नाझारो आर्टिस्टिक डायरेक्टर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शाहरुख खान सारख्या जिवंत दिग्गजाचे लोकार्नो येथे स्वागत करणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान अभूतपूर्व आहे. खान एक धाडसी कलाकार आहेत ज्यांनी प्रेक्षकांशी कधीही संपर्क गमावला नाही. त्यांचे चाहते त्यांच्याकडून ज्या अपेक्षा करतात त्या ते पूर्ण करण्यासाठी तयार असतात.अतिशय आधुनिक आणि नम्र कलाकार असलेले शाहरुख खान आपल्या काळातील एक दंतकथा आहे.
२०२३ हे वर्ष शाहरुख साठी खूप महत्त्वाचं होतं. या वर्षात त्याचे रिलीज झालेले पठाण, जवान आणि डंकी हे सिनेमा सुपरहिट झाले. या यशाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखला मिळालेला हा पुरस्कार महत्त्वपूर्ण ठरतो.
शाहरुखला 10 ऑगस्ट रोजी ओपन-एअर व्हेन्यू, पियाझा ग्रांडे येथे हा पुरस्कार दिला जाईल.संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा त्यांचा सर्वात प्रतिष्ठित चित्रपट देखील महोत्सवादरम्यान प्रदर्शित केला जाणार आहे.
शाहरुख आता लवकरच किंग या त्याच्या आगामी सिनेमावर काम करतो आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये किंग या आगामी सिनेमाची स्क्रिप्ट एका बाजूला ठेवलेली अनेक चाहत्यांनी पाहिली होती. या सिनेमात त्याची मुलगी अभिनेत्री सुहाना सुद्धा काम करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुजॉय घोष या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.