सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ जुलै २०२४- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त नेहरू नगर येथे त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुभाष चव्हाण, प्रा.भोजराज पवार, प्रमिला तुपलवंडे, भीमाशंकर टेकाळे, नागेश म्हेत्रे, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, कालिदास कालपगार, सागर उबाळे, मल्लिनाथ सोलापूरे, सलीम मनुरे, सुमन जाधव, अरुणा बेंजरापे, धीरज खंदारे, राजू गडदे ,मोहसीन फुलारी, अप्पा सलगर, श्रीकांत दासरी, शोभा बोबे, सुनील डोळसे, राजू टिळेकर, सरदार कोळी, अभिलाष अच्युगटला आदी उपस्थित होते.