नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज –भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब देऊन सन्मानीत करण्यात आलेले नारायणगाव मधील नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.मनोहर डोळे यांची रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

नारायणगाव येथील पद्मश्री डॉ मनोहर डोळे यांच्या डोळे हॉस्पिटला नुकतीच ना.रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी डोळे हॉस्पिटल मधील कर्मचारीवृंद तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, रिपब्लिकन व्यापारी आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष पोपट घनवट, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे; रिपाइं चे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम,लक्ष्मण भालेराव,सचिन वाघमारे,जुन्नर तालुकाध्यक्ष पोपट राक्षे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.