युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज चं माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आढीव ता.पंढरपुर येथे युवासेनेतील सहकारी पंढरपूर उपतालुका प्रमुख समाधान इंद्रजित गोरे यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे वक्ते रणजित बागल यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना रणजित बागल म्हणाले, आदित्य ठाकरेंचा वाढदिवस एका चांगल्या उपक्रमाने साजरा होतो आहे याचा आनंद वाटतो.रक्तदान हे फार महत्वाचे दान आहे. कोरोना सारख्या भीषण काळात रक्तदानाचे महत्व आपल्या सर्वांना समजले आहे. हा उपक्रम शिवसेनेच्या कार्याला साजेसा आहे. समाजकारण ही शिवसेनेची खरी ओळख आहे हे आज पुन्हा सिध्द झाले आहे.
यावेळी सरपंच बालाजी वसेकर ,इंद्रजित गोरे,विलास कांबळे,गणेश जाधव,औदुंबर चव्हाण,दत्ता गोरे,दत्ता चव्हाण,शिवसेना युवासेना शाखा आढीव या सर्वांच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आढीव येथील या रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात आलेल्या मान्यवरांचे व रक्तदात्यांचे श्री गोरे व शिवसैनिकांनी स्वागत केले आणि आभार मानले.