नवनिर्वाचित केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांनी घेतली विधानपरिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट
यावेळी विविध आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यात आयुर्वेद, युनानी यासंदर्भात नवीन विद्यापीठ उभारण्याबाबत चर्चा झाली

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२: केंद्रीय मंत्रिमंडळात बुलढाणाचे शिवसेना खा.प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून नियुक्ती झाली आहे.
आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जावून खा.प्रतापराव जाधव यांनी साहेबांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली.तसेच विधानपरिषदचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी विविध आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यात आयुर्वेद,युनानी या संदर्भात नवीन विद्यापीठ उभारण्याबाबत चर्चा झाली तसेच अनेक विषयावर चर्चा झाली व राज्यातील महिलांच्या आरोग्य, इतर सामाजिक विषय असो यावर केंद्रीय आयुष विभागाचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सुशीबेन शहा,प्रेमलता सोनवणे, वर्षा मोरे,कला शिंदे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.