पदपथावर वाढलेली झाडीझुडपे नगरपालिका काढणार का ? – सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार

पदपथावर वाढलेली झाडीझुडपे नगरपालिका काढणार का ? – सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०६/२०२४- पंढरपूर शहरात रस्त्याची कामे होऊन रस्ते चांगले झाले ही पंढरपूरकरांसाठी चांगली गोष्ट आहे.रस्त्याच्या दुतर्फा पदपथही निर्माण केले गेले.परंतु सध्या या पदपथावर अनेक ठिकाणी झाडीझुडपे वाढलेली आहेत. पादचार्यांना याचा त्रास होत आहे.
तसेच बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईनवरती जाळ्या बसवलेल्या नाहीत.यामुळे प्लास्टिकच्या अनेक वस्तू जाऊन ड्रेनेज तुंबण्याचीही शक्यता आहे.चालू वर्षी पाऊस जास्त असल्याने पंढरपूर नगरवासीयांना याचा प्रचंड त्रास होऊ शकतो. नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देऊन पदपथावरील झाडीझुडपे काढणार का ? ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन वरती जाळ्या नाहीत तिथे जाळ्या बसवणार का? की एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार ? असा प्रश्न सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार यांनी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top